Home |  | Audio |  | Index |  | Verses

1 राजे 1/ Kings

अध्याय : 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22
1 हिराम हा सोराचा (तायरचा) राजा होता. त्याचे दावीदाशी सख्य होते. त्यामुळे त्याने शलमोन राज्यावर आल्याचे कळताच आपल्या सेवकांना शलमोनाकडे पाठवले.
2 शलमोनाने राजा हिरामला असा निरोप पाठवला.
3 “माझे वडील सतत युध्दात गुंतलेले असल्यामुळे त्यांना परमेश्वर देवासाठी मंदिर बांधता आले नाही. सर्व शत्रूंचा पाडाव होईपर्यंत ते थांबले होते.
4 परंतु आता परमेश्वराने सर्व बाजूंनी माझ्या राज्याला शांतता दिली आहे. मला आता शत्रू नाहीत. माझ्या लोकांना कोणताही धोका नाही.
5 “परमेश्वराने माझ्या वडीलांना एक वचन दिले होते. परमेश्वराने सांगितले होते, ‘तुझ्यानंतर मी तुझ्या मुलाला राजा करीन. तो माझ्या सन्मानार्थ मंदिर बांधील’ त्याप्रमाणे माझ्या परमेश्वर देवाच्या सन्मानार्थ एक मंदिर उभारण्याची माझी योजना आहे.
6 त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. तुम्ही तुमची माणसे लबानोन येथे पाठवा. तेथील गंधसरुची झाडे त्यांना माझ्यासाठी कापायला सांगा. माझेही चाकर मी त्यांच्याबरोबर पाठवीन. तुम्ही तुमच्या नोकरांची जी मजुरी ठरवाल ती मी देईन. पण मला तुमची मदत हवी आहे. आमचे सुतार तुमच्या दिदोनी सुतारांइतके कुशल नाहीत.”
7 हिरामला शलमोनाचा निरोप ऐकून फार आनंद झाला. तो म्हणाला, “दावीदाला एवढा ज्ञानी मुलगा या मोठ्या देशावर राज्य करण्यासाठी दिल्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो.”
8 मग हिरामने शलमोनाला असा संदेश पाठवला “तुझे म्हणणे मला कळले. देवदार आणि गंधसरुची तुला हवी तितकी झाडे मी तुला देईल.
9 माझे नोकर ती लबानोनपासून समुद्रापर्यंत वाहून आणतील मग त्याचे तराफे करुन तुला हव्या त्या ठिकाणी समुद्रावरुन ते आणतील. तेथे ते तराफे सोडवले जातील. मग तू ती झाडे घे.”
10 हिरामने शलमोनाला त्याच्या गरजेप्रमाणे सर्व गंधसरु व देवदारुची झाडे दिली. आणि शलमोनाने हिरामला त्याच्या कुटुंबासाठी दरवर्षी 1,20,000 बुशेल गहू आणि 1,20,000 गंलन निर्भेळ तेल दिले.
11
12 परमेश्वराने कबूल केल्याप्रमाणे शलमोनाला शहाणपण दिले. आणि हिराम व शलमोन या दोघांमध्ये सख्य निर्माण झाले. या दोन राजांनी आपसात शांततेचा करार केला.
13 शलमोनाने वेठबिगारीवर इस्राएलची 30,000 माणसे या कामासाठी नेमली.
14 अदोनीराम नावाच्या माणसाला त्यांचा प्रमुख म्हणून नेमले. शलमोनाने या लोकांचे तीन गट केले. प्रत्येक गटात 10,000 माणसे होती. प्रत्येक गट लबानोनमध्ये एक महिना काम करी आणि घरी परतून दोन महिने आराम करत.
15 ऐंशी हजार लोकांना शलमोनाने डोंगराळ भागात कामाला लावले. त्यांना पाथरवटाचे काम होते. दगड वाहून नेणारी माणसे सत्तर हजार होती.
16 या काकऱ्यांवर देखरेख करणारी तीन हजार तीनशे माणसे होती.
17 त्यांना शलमोनाने मोठे, मौल्यवान चिरे मंदिराच्या पायासाठी म्हणून कातायला सांगितले. ते फार काळजीपूर्वक कापण्यात आले.
18 मग शलमोन आणि हिरामच्या बांधकाम करणाऱ्यांनी आणि गिबलोस येथल्या लोकांनी ते चांगले घडवले. मंदिर उभारणीसाठी घडीव चिरे आणि ओंडके त्यांनी तयार केले.

Top |  | अगला-  |  | Index |  | Home
Full online version here [with search engine, multilingual display and audio Bible]