Home |  | Audio |  | Index |  | Verses

होशेय / Hosea

अध्याय : 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14
1 बैरीचा मुलगा होशेय याला परमेश्वराचा संदेश आला, त्या वेळेस उज्जीया, योथाम, आहाज आणि हिज्कीया हे यहूदाचे राजे होते. व योवाशाचा मुलगा यराबाम इस्राएलावर राज्य करीत होता.
2 हा होशेयला आलेला परमेश्वराचा पहिलाच संदेश होता. परमेश्वर म्हणाला, “जा आणि वेश्येशी लग्न कर. तिला मुले होऊ देत. का? कारण ह्या देशातील लोक वेश्येप्रमाणेच वागले आहेत. त्यांनी परमेश्वराचा विश्वासघात केला आहे.”
3 म्हणून होशयने दिब्लाइमाची मुलगी गोमर हिच्याशी लग्न केले. तिला दिवस गेले व तिला मुलगा झाला.
4 परमेश्वराने होशेयला सांगितले, “या मुलाचे नाव इज्रेल ठेव. का? कारण लवकरच, येहू घराण्याने इज्रेल दरीत जो रक्तपात केला, त्याबद्दल मी त्यांना शिक्षा करणार आहे. मग मी इस्राएल राष्टांचा शेवट करीन.
5 त्या वेळी मी इज्रेल दरीत, इस्राएलाचे धनुष्य मोडीन.”
6 मग गोमरला पुन्हा दिवस गेले. ह्या खेपेस तिने एका मुलीला जन्म दिला. परमेश्वर होशेयला म्हणाला, “तिचे नाव लो - रूहामा ठेव. का? कारण मी यापुढे इस्राएल राष्टाला अजिबात दया दाखविणा नाही. मी त्यांना क्षमा करणार नाही.
7 पण मी यहूदावर दया करीन. मी यहूदा राष्टाला वाचवीन, त्यांना वाचविण्यासाठी मी धनुष्य नाही. किंवा तलवार, यांचा उपयोग करणार नाही. मी माझ्या सामर्थ्याच्या बळावर त्यांना तारीन.”
8 मग लो-रूहमेचे दूध तुटल्यावर गोमरला पुन्हा दिवस गेले या खेपेला तिने एका मुलाला जन्म दिला.
9 परमेश्वराने त्या मुलाचे नाव “लो-अम्मी ठेवण्यास सांगितले. का? कारण तुम्ही माझे लोक नव्हेत व मी तुमचा परमेश्वर नाही.”
10 “भविष्यकाळात, समुद्रकाठच्या वाळूच्या कणांप्रमाणे इस्राएली लोक असतील. तुम्ही वाळू मापू वा मोजू शकत नाही. मग ‘तुम्ही माझे लोक नव्हत’ असे ज्यांना म्हणण्यात आले, ‘त्याऐवजी त्यांना तुम्ही जिवंत परमेश्वराची लेकरे आहात.’ असे म्हणण्यात येईल.
11 “मग यहूदाचे व इस्राएलचे लोक एकत्र येतील. ते त्यांच्यासाठी एक राजा निवडतील. त्याचे राष्ट भूप्रदेशापेक्षा खूपच मोठे असेल. तेव्हा इज्रेलचा दिवस खरोखर चांगला असेल.”

या Top | अगला-  |  | Index |  | Home
Full online version here [with search engine, multilingual display and audio Bible]