Home |  | Audio |  | Index |  | Verses

योना / Jonah

अध्याय : 1 2 3 4
1 माशाच्या पोटात असतानाच योनाने त्याच्या परमेश्वर देवाची प्रार्थना केली तो म्हणाला,
2 “मी फार मोठ्या संकटात सापडलो होतो. मी मदतीसाठी परमेश्वराला हाक मारली, आणि त्याने मला ओ दिली. जेव्हा मी खोल थडग्यात होतो तेव्हा, हे परमेश्वर, मी तुझी आळवणी केली आणि तू माझा आवाज ऐकलास.
3 “तू मला समुद्रात फेकलेस तुझ्या प्रचंड लाटा माझ्याभोवती पाणी होते.
4 मग मी विचार केला, ‘की मी आता अशा ठिकाणी जावे की जिथे तू मला पाहू शकणार नाहीस.’ तरी पण मी तुझ्या पवित्र मंदिराकडे मदतीच्या आशेने पाहतच राहिलो.
5 “समुद्राच्या पाण्याने मला वेढले पाण्याने माझे तोंड बुडाले आणि मी श्वासोच्छवास करु शकत नव्हतो मी खाली खूप खोल समुद्रात गेलो माझ्या डोक्याभोवती समुद्रशेवाळ गुंडाळले गेले.
6 मी समुद्रतळाशी, पर्वताच्या पायथ्याशी होतो मला कायमचे असे बंदिवासात राहावे लागणार असेच मला वाटले पण माझ्या परमेश्वर देवाने मला थडग्यातून बाहेर काढले परमेश्वरा, तू मला नवजीवन दिलेस!
7 “माझ्या आत्म्याने सर्व आशा सोडून दिल्या होत्या पण मग मला परमेश्वराचे स्मरण झाले परमेश्वरा, मी तुझी प्रार्थना केली आणि तुझ्या पवित्र मंदिरात ती तू ऐकलीस.
8 “काहीजण निरुपयोगी मूर्तीची पूजा करतात पण ते पूतळे त्यांना कधीच मदत करीत नाहीत.
9 फक्त परमेश्वरा मुळेच तारण मिळते “हे परमेश्वरा, मी तुला यज्ञ अर्पण करीन मी तुझे स्तवन करीन आणि कृतज्ञता व्यक्त करीन मी तुला नवस बोलेन आणि तो फेडेन.”
10 मग परमेश्वर माशाशी बोलला आणि माशाने उलटी करून योनालाकोरड्या भूमीवर टाकले.

या Top | अगला-  |  | Index |  | Home
Full online version here [with search engine, multilingual display and audio Bible]