Home |  | Audio |  | Index |  | Verses


प्रेषितांचीं कृत्यें / Acts

अध्याय : 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28
1 मग काही माणसे यहूदीया प्रांतातून अंत्युखियास आली. ती बंधुजनांना (यहूदीतर) शिक्षण देऊ लागली: “तुमची सुंता झालेली नसेल तर तुमचे तारण होणार नाही. मोशेने आम्हांला हे करायला शिकविले.”
2 पौल व बर्णबा या शिक्षणाविरुद्ध होते. या विषयावर त्या लोकांशी पौलाने व बर्णबाने वाद घातला, म्हणून लोकांनी असे ठरविले की, पौल, बर्णबा व इतर काही जणांना यरुशलेमला पाठवायचे. हे लोक त्या ठिकाणी प्रेषित व वडीलजनांशी या विषयावर अधिक बोलण्यासाठी गेले.
3 मंडळीने त्यांना प्रवासास जाण्यासाठी मदत केली. हे लोक फेनीके व शोमरोन प्रांतातून जात असता यहूदीतर विदेशी लोक देवाकडे कसे वळले, याविषयी सविस्तर हकीगत त्यांनी तेथील बंधुवर्गाला सांगितली. त्यामुळे ते फार आनंदित झाले.
4 ते जेव्हा यरुशलेमला पोहोंचले तेव्हा तेथील रिव्रस्ती मंडळी, प्रेषित आणि वडीलजन यांनी त्यांचे स्वागत केले. त्यावेळी पौल व बर्णबा यांनी आपल्या हातून देवाने जे काम करुन घेतले त्याविषयी सविस्तर सांगितले.
5 परुशी गटातील काही विश्वासणारे उभे राहीले आणि म्हणाले, “यहूदीतर विश्वासणाऱ्यांची सुंता झालीच पाहिजे. तसेच आपण त्यांना मोशेचे नियम पाळण्याविषयी शिकविले पाहिजे!”
6 मग प्रेषित आणि वडीलजन या समस्येचा अभ्यास करण्यासाठी एकत्र जमले.
7 त्यावर प्रदीर्घ चर्चा झाली. मग पेत्र उभा राहिला. आणि त्यांना म्हणाला, “माझ्या बंधूनो मला माहीत आहे, सुरुवातीला जे काही घडले, ते तुमच्या आठवणीत आहे. जे यहूदी नाहीत, त्या लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी तुमच्यामधून देवाने माझी निवड केली. यासाठी की, त्यांनीही विश्वास धरावा.
8 देव सर्वांचे विचार जाणतो, आणि त्याने या यहूदीतर लोकांचा स्वीकार केला आहे. देवाने जसा आम्हांला पवित्र आत्मा दिला, तसाच त्यांनाही देऊन त्याने हे आम्हांस दाखवूत दिले.
9 देवाच्या दृष्टीने ते लोक आपल्यापेक्षा वेगळे नाहीत. जेव्हा त्यांनी विश्वास ठेवला, तेव्हा त्याने त्यांची ह्रदये शुद्ध केली.
10 मग आता यहूदीतर लोकांच्या मानेवर जड जू तुम्ही का ठेवीत आहात? तुम्ही देवाला राग आणीत आहात काय? आपण व आपले वाडवडील (पूर्वज) हे ओझे वाहण्याइतके सशक्त नव्हतो.
11 आम्ही असा विश्वास धरतो की, आम्ही आणि हे लोक प्रभु येशूच्या कृपेमुळे तारले जाणार आहोत.”
12 मग सगळे लोक शांत झाले, ते पौल व बर्णबाचे बोलणे ऐकू लागले. पौलाने व बर्णबाने लोकांना सांगितले की, देवाने त्यांच्याद्वारे यहूदीतर लोकांमध्ये चमत्कार व अदभूत कृत्ये केली.
13 पौलाने व बर्णबाने आपले बोलणे संपविले. मग याकोब बोलला. तो म्हणाला, “माझ्या बंधूनो, माझे ऐका.
14 शिमोन (पेत्र) याने यहूदीतर लोकांना देवाने आपले प्रेम कसे दाखविले ते सांगितले. पहिल्यांदाच देवाने यहूदीतर लोकांना स्वीकारले. आणि त्यांना आपले लोक बनविले.
15 संदेष्टेयांच्या शब्दांनी सुद्धा याला सहमती दर्शविली:
16 ‘मी (देव) यानंतर परत येईन मी दाविदाचे घर पुन्हा बांधीन ते पडलेले आहे त्याच्या घराचे पडलेले भाग मी पुन्हा बांधीन मी त्याचे घर नवे करीन
17 मग इतर सर्व लोक देवाचा शोध करतील सर्व यहूदीतर लोकसुद्धा माझे लोक आहेत असे मी मानतो. प्रभु (देव) असे म्हणाला, व हे करणारा तोच आहे.
18 या सर्व गोष्टी सुरुवातीपासूनच माहीत आहेत’ अमोस 9:11-
12
19 “म्हणून मला वाटते जे यहूदीतर बंधु देवाकडे वळले आहेत, त्याना आपण तसदी देऊ नये.
20 त्याऐवजी आपण त्यांना एक पत्र लिहू या. आपण त्यांना या गोष्टी सांगू:मूर्तिपुढे ठेवलेले अन्न खाऊ नका. (त्यामुळे अन्न अशुद्ध होते) कोणत्याही प्रकारचे अनैतिक पाप करु नका. रक्त चाखू नका गुदमरुन मारलेले प्राणी खाऊ नका.
21 त्यांनी या गोष्टी करु नयेत, कारण अजूनसुद्धा प्रत्येक शहारात यहूदी लोक आहेत जे मोशेचे नियम शिकवितात. बऱ्याच वर्षांपासून दर शब्बाथ दिवशी सभास्थानातून मोशेचे नियम वाचण्यात येतात.”
22 प्रेषितांना, वडीलजनांना व सगळ्या मंडळीला वाटत होते की, पौल व बर्णबा यांच्याबरोबर आणखी काही माणसे अंत्युखियाला पाठवावीत, मंडळीने त्यांचे स्वत:जे काही लोक निवडलले.
23 त्यांनी यहूदा (बर्सब्बा) आणि सीला यांना निवडले. यरुशलेमधील बंधुवर्गामध्ये या माणसांचा आदर केला जात असे. मंडळीन या लोकांबरोबर हे पत्र पाठविले. पत्रात असे लिहिले होते की,प्रेषित, वडीलजन आणि तुमचे बंधुजन यांजकडून अंत्युखिया शहरातील तसेच सीरीया व किलकिया देशातील सर्व यहूदी नसलेल्या बांधवांस: प्रिय बंधूनो,
24 आम्ही असे ऐकले की, आमच्यातील काही लोक तुमच्याकडे आले. ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या त्यामुळे तुम्हांला त्रास झाला व तुम्ही हताश झालात. परंतु आम्ही त्यांना हे करण्यास सांगितले नाही!
25 आम्ही सर्वांनी या गोष्टीला सहमती दर्शविली की, काही लेकांची निवड करुन त्यांना तुमच्याकडे पाठवावे. आमचे प्रिय मित्र पौल व बर्णबा यांच्यासह ते असतील.
26 बर्णबा व पौल यांनी आपल्या प्रभु येशू रिव्रस्ताच्या सेवेसाठी आपले जीवन दिले आहे.
27 म्हणून आम्ही यहूदा व सीला यांना त्यांच्याबरोबर पाठवत आहोत. ते सुद्धा तुम्हांला त्याच गोष्टी सांगतील.
28 पवित्र आत्म्याला असे वाटते की, तुमच्यावर आता आधिक ओझे असू नये. आणि आम्हांला ते मान्य आहे. तुम्ही फक्त पुढील गोष्टी कराव्यात:
29 कोणतेही अन्न जे मूर्तीला वाहिले आहे ते खाऊ नका रक्त चाखू नका गुदमरुन मारलेले प्राणी खाऊ नका. कोणत्याही प्रकारचे अनैतिक पाप करु नका.जर तुम्ही या गोष्टींपासून दूर राहाल, तर तुम्ही चांगले कराल आता आम्ही तुमचा निरोप घेतो कळावे.’
30 मग पौल, बर्णबा, यहूदा व सीला यांनी यरुशलेम सोडले. ते अंत्युखियास गेले. अंत्युखियात त्यांनी विश्वासणाऱ्यांना एकत्र केले. आणि त्यांना ते पत्र दिले.
31 जेव्हा त्यांनी ते पत्र वाचले. ते आनंदित झाले. पत्राने त्यांचे समाधात झाले.
32 यहूदा व सीला हेसुद्धा संदेष्टे होते. त्यांनी विश्वासणाऱ्या बंधूंना विश्वासात भक्कम करण्यासाठी पुष्कळ गोष्टी सांगितल्या.
33 यहूदा व सीला काही काळ तेथे राहिल्यानंतर ते निघून गेले. बंधूंकडून त्यांना शांतीचा आशीर्वाद मिळाला, ज्या यरुशलेममधील बंधूनी यहूदा व सीला यांना पाठवले होते, त्यांच्याकडे ते परत गेले.
34
35 पण पौल व बर्णबा अंत्युखियातच राहिले. त्यांनी व इतर पुष्कळ लोकांनी सुवार्ता सांगितली आणि प्रभूचा संदेश लोकांना शिकविला.
36 काही दिवसांनंतर पौलाने बर्णबाला सांगितले, “आपण पुष्कळ गावात प्रभूचा संदेश दिला. आपण पुन्हा या गावांमध्ये तेथील बंधुभगिनींना भेट देण्यासाठी आणि त्यांचे कसे काय चालले आहे हे पाहण्यासाठी जायला हवे.”
37 बर्णबाला त्याच्यासोबत योहान (मार्क) यालाही घ्यायचे होते.
38 पण ज्याने पंफुलिया येथे त्याची साथ सोडली व आपले काम पूर्ण केले नाही, त्याला आपल्यासोबत घेऊ नये असे पौलाचे म्हणणे होते
39 पौल आणि बर्णबा यांच्यात यावरुन मोठा वाद झाला. ते विभक्त झाले व वेगळ्या मार्गांनी गेले. बर्णबा योहानासह कुप्र येथे समुद्रमार्गे गेला.
40 पौलाने सीलाला आपल्यासोबत नेण्यासाठी निवडले. अंत्युखियातील बांधवांनी, पौलाला देवाच्या कृपेवर सोपवले आणि मग त्यांना रवाना केले.
41 पौल, सीरीया व किलकीया भागातील मंडळ्यांना स्थैर्य देत गेला.

Top |  | अगला-  |  | Index |  | Home
Full online version here [with search engine, multilingual display and audio Bible]