Home |  | Audio |  | Index |  | Verses

1 तीमथ्याला / 1 Timothy

अध्याय : 1 2 3 4 5 6
1 हे सत्य वचन आहे: जर कोणी (मंडळीत) अध्यक्ष(सर्वांगीण काळजीवाहक) होण्याची इच्छा धरतो तर तो चांगल्या कामाची इच्छा धरतो.
2 आता अध्यक्षाने (सर्वागीण काळजीवाहकाने) त्याचे जीवन लोकांनी टीका करु नये अशा रीतीने जगावे. त्याला एकच पत्नी असावी.
3 तो मद्य पिणारा नसावा, तो हिंसक वृत्तीचा नसावा तर तो सभ्य, आत्मसंयमी, आदरणीय, व आदरातिाथ्य करणारा असावा. तो शिकविण्यात प्रवीण असावा.
4 तो पैशावर प्रेम करणारा नसावा. त्याने त्याच्या कुटुंबाचा चांगला पुढारी असावे आणि त्याने त्याची लेकरे त्याच्या आज्ञेत ठेवावीत.
5 (जर एखाद्याला स्वत:च्या कुटुंबाची देखभाल करता येत नसेल तर तो देवाच्या मंडळीची काळजी कशी घेईल?)
6 तो ह्या कार्यात नवशिका नसावा म्हणजे तो गर्वाने फुगून जाणार नाही. व सैतानाला जशी शिक्षा झाली तशी शिक्षा होऊन त्याचा अंत होणार नाही.
7 आणखी म्हणजे बाहेरच्या लोकांमध्ये त्याचे चांगले नाव असावे. यासाठी की त्याच्यावर टीका होऊ नये. व त्याने सैतानाच्या जाळ्यात सापडू नये
8 त्याचप्रमाणे, विशेष मदतनीसआदरणीय असावेत, ते दुटप्पी नसावेत, ते विश्वसनीय असावेत. ते अति मद्यपान करणारे व दुतोंडे नसावेत आणि अनीतिने पैसे मिळवून श्रीमंत होण्याची त्यांना आवड नसावी.
9 देवाने जे आम्हांला प्रकट केले आहे ते आमच्या विश्वासाचे सखोल सत्य त्यांनी स्वच्छ विवेकाने धरून ठेवावे.
10 वडीलांप्रमाणे यांचीसुद्धा प्रथम परीक्षा व्हावी, मग जर त्यांच्या विरुद्ध असे आढळले नाही, तर त्यांनी मदतनीसाचे काम करावे.
11 त्याचमप्रमाणे,(विशेष मदतनीस) स्रियांनीही आदरणीय असावे. त्या चुगलखोर नसाव्यात. तर सभ्य व प्रत्येक बाबतीत विश्वसनीय असाव्यात.
12 जे खास मदतनीस आहेत त्यांना फक्त एकच पत्नी असावी. आणि त्यांनी त्यांच्या मुलांची व कुटुंबाची चांगल्या प्रकारे काळजी घ्यावी.
13 कारण मदतनीस म्हणून जे चांगली सेवा करतात, ते त्यांच्यासाठी आदरणीय स्थान मिळवितात आणि ख्रिस्त येशूमध्ये त्यांच्या विश्वासात महान आत्मविश्वास मिळवितात.
14 मी तुझ्याकडे लवकरच येण्याची इच्छा धरून असलो तरी मी तुला या गोष्टी लिहीत आहे.
15 यासाठी की, जरी मला उशीर झाला तरी देवाच्या घरात म्हणजे जिवंत देवाच्या मंडळीत एखाद्या व्यक्तीने कसे वागावे हे तुला माहीत असावे. ती मंडळी सत्याचा खांब व पाया अशी आहे.
16 आणि आपल्या सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे.तो मानवी शरीरात दिसला; आत्म्याने तो नीतिमान ठरविला गेला, देवतूतांनी त्याला पाहीले होते; राष्ट्रांमध्ये तो गाजविला गेला. जगाने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि स्वर्गामध्ये तो गौरवाने घेतला गेला.

Top |  | अगला-  |  | Index |  | Home
Full online version here [with search engine, multilingual display and audio Bible]