Home |  | Audio |  | Index |  | Verses

इब्री लोकांस / Hebrews

अध्याय : 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13
1 प्रत्येक मुख्या याजकाची निवड लोकांमधून होते. आणि लोकांच्या वतीने त्यांच्या पापांसाठी जी दाने व अर्पणे देवाला सादर केली जातात, त्या कामाकरिता मुख्य याजक नेमलेला असतो.
2 प्रत्येक मुख्य याजक हे जे चुका करतात व जे अज्ञानी आहेत त्यांच्याशी सौम्यपणे वागण्यास असमर्थ असतो कारण तो स्वत: दुबळा असतो.
3 आणि त्या दुबळेपणामुळे त्याने त्याच्या पापांसाठी तसेच लोकांच्या पापांसाठी अर्पणे केलीच पाहिजेत.
4 आणि कोणीही मुख्य याजकपणाचा बहुमान स्वत:च्या पुढाकाराने घेत नसतो, तर अहरोनाला होते तसे त्यालाही देवाचे पाचारण असणे आवश्यक असते.
5 त्याचप्रमाणे, ख्रिस्ताने मुख्य याजक होण्याचा गौरव स्वत:हून आपणावर घेतले नाही, परंतु देव ख्रिस्ताला म्हणाला,“तू माझा पुत्र आहेस आज मी तुला जन्म दिला आहे.”स्तोत्र. 2:
7
6 दुसऱ्या शास्त्रभागात तो असे म्हणतो,“मलकीसदेकाप्रमाणे तू अनंतकाळासाठी याजक आहेस” स्तोत्र. 1
10 :4 7 येशूच्या पृथ्वीवरील जीवनाच्या काळात, त्याने देवाकडे मोठ्याने ओरडून आणि रडून प्रार्थना व विनंत्या केल्या. जो देव त्याला मृत्युपासून वाचवू शकत होता. आणि देवाविषयीच्या त्याच्या सन्माननीय आदरामुळे येशूच्या प्रार्थना ऐकल्या गेल्या. 8 जरी तो पुत्र होता, तरी त्याने ज्या गोष्टी सोशिल्या त्यापासून तो आज्ञाधारकपणा शिकला. 9 आणि नंतर त्याला परिपूर्ण केल्यावर. जे त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्यासाठी अनंतकाळच्या तारणासाठी तो उगम झाला
10 व मलकीसदेेकाच्या संप्रदायास अनुसरून देवाकडून तो प्रमुख याजक म्हणून नियुक्त झाला.
11 याविषयी सांगण्यासारखे पुष्कळ आहे, पण तुम्हांला ते स्पष्ट करणे कठीण आहे. कारण तुम्ही ऐकण्यात खूप मंद झाला आहात.
12 आतापर्यंत तुम्ही शिक्षक व्हायला हवे होते, तरी देवाच्या शिक्षणाचे प्राथमीक धडे पुन्हा तुम्हाला कोणीतरी शिकविण्याची गरज आहे. तुम्हांला दूधाची गरज आहे, सकस अन्राची नव्हे!
13 कारण जो कोणी अजून दुधावरच जगतो त्याला वचनाच्या पोक्त शिक्षणाची काहीही माहिती नसते. कारण अजून तो बाळच असतो.
14 परंतु याउलट सकस अन्र हे प्रौढांसाठी योग्य असते. ख्रिस्ती लोकांची इंद्रिये ख्रिस्ती जीवनाच्या सरावामुळे चागंले व वाईट यांतील भेट ओळखण्यास तयार झालेली असतात.

Top |  | अगला-  |  | Index |  | Home
Full online version here [with search engine, multilingual display and audio Bible]