Home |  | Audio |  | Index |  | Verses

लेवीय / Leviticus

अध्याय : 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27
1 परमेश्वर मोशेले म्हणाला,
2 “अहरोन त्याचे मुलगे आणि सर्व इस्राएल लोक ह्यांना सांग की परमेश्वराने आज्ञा दिली आहे ती ही:
3 इस्राएल घराण्यातील एखाद्या माणसाने, छावणीत किंवा छावणीबाहेर एखादा बैल; कोकरू किंवा बकरा मारला,
4 तर त्या माणसाने तो प्राणी परमेश्वराला अर्पण करण्यासाठी दर्शनमंडपापाशी आणावा; त्याने त्या प्राण्याचा वध करुन रक्त सांडले आहे म्हणून त्याने तो परमेश्वराच्या निवासमंडपापाशी आणावा; त्याने जर तसे केले नाही तर त्या माणसाला आपल्या लोकांतून बाहेर टाकावे.
5 ह्या नियमाचा हेतू असा की इस्राएल लोक आपले पशू खुल्या शेतात मारतात ते त्यांनी दर्शनमंडपाच्या दारापाशी याजकाकडे परमेश्वरासमोर आणावे, व परमेश्वराकरिता शांत्यर्पणे म्हणून अर्पावे.
6 याजकाने त्यांचे रक्त दर्शन मंडपाच्या दारापाशी परमेश्वराच्या वेदीवर टाकावे आणि परमेश्वराला सुवास म्हणून त्यांच्या चरबीचा होम करावा म्हणजे त्या सुवासाने त्याला आनंद होईल.
7 आणि यापुढे त्यांनी ‘अजमूर्तीना’ अजिबात बळी अर्पण करु नयेत. ते त्या दुसऱ्या देवांच्या मागे लागले व अशारीतीने त्यांनी वेश्येप्रमाणे आचरण केले. हे तुम्हाला पिढ्यान् पिढ्या कायमचे विधी नियम आहेत!
8 “तु त्यांना सांग की इस्राएल घराण्यापैकी किंवा त्यांच्यामध्ये राहाणाऱ्या परकीय किंवा परदेशीय लोकांपैकी कोणी होमार्पण अथवा यज्ञ केला,
9 तर त्याने तो परमेश्वराला अर्पण करण्यासाठी दर्शनमंडपाच्या दारापाशी आणावा; त्याने तसे न केल्यास आपल्या लोकांतून त्याला बाहेर टाकावे.
10 “इस्राएल घराण्यापैकी किंवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या परदेशीय लोकांपैसी कोणी रक्त खाईल! तर मी देव त्या माणसापासून आपले तोंड फिरवीन व त्याला आपल्या लोकांतून बाहेर टाकीन.
11 कारण शरीराचे जीवन रक्तात असते आणि ते वेदीवर ओतण्याविषयी मी विधीनियम लावून दिले आहेत; तुम्ही घेतलेल्या जिवाच्या भरपाईबद्दल ते रक्त वेदीवर मला दिले पाहिजे; तुमच्या जिवाबद्दल प्रायश्चितासाठी ते वेदीवर ओतले पाहिजे.
12 म्हणून मी इस्राएल लोकांना सांगतो की तुमच्यातील कोणीही, तसेच तुमच्यामध्ये राहाणाऱ्या परदेशीयांनीही रक्त सेवन करु नये.
13 “इस्राएलपैकी असो किंवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या परदेशीयापैकी असो! कोणी खाण्यालायक पशूची किंवा पक्ष्याची शिकार केली तर त्याने त्याचे रक्त जमिनीवर ओतून मातीने झाकावे.
14 कारण मासांमध्ये जर अद्याप रक्त आहे तर त्या प्राण्याचा जीव अद्याप त्याच्या मांसात आहे, म्हणून मी इस्राएल लोकांना ही आज्ञा देतो की ज्या मांसात अद्याप रक्त आहे ते मांस खाऊनका! जर कोणी माणूस रक्त खाईल, तर त्याला आपल्या लोकांतून बाहेर टाकावे.
15 “त्याचप्रमाणे कोणी इस्राएल माणूस असो किंवा त्यांच्यामध्ये राहणार परदेशीय असो! तो जर आपोआप मेलेल्या किंवा जंगली जनावराने मारलेल्या प्राण्याचे मांस खाईल तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे; त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे म्हणजे मग तो शुद्ध होईल.
16 त्याने आपले कपडे धुतले नाहीत किंवा स्नान केले नाही तर तो आपल्या अपराधाबद्दल दोषी राहील, त्याने त्याबद्दल शिक्षा भोगावी.”

Top |  | अगला-  |  | Index |  | Home
Full online version here [with search engine, multilingual display and audio Bible]