Home |  | Audio |  | Index |  | Verses

लेवीय / Leviticus

अध्याय : 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27
1 जेव्हा एखाद्याला परमेश्वरदेवासाठी अन्नार्पण करावयाची इच्छा असेल, तेव्हा त्याने मैदा आणावा; त्याने त्यात तेल ओतावे व त्यावर धूप ठेवावा;
2 मग त्याने ते अर्पण अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांच्याकडे आणावे; त्यातून मूठभर मैदा, तेल व सगळा धूप घेऊन स्मरणासाठीचे अर्पण म्हणून वेदीवर त्याचा होम करावा. हे परमेश्वरासाठी सुवासिक हव्य होय. त्याच्या गंधाने परमेश्वराला आनंद होतो.
3 “अन्नार्पणातून जे काही डरेल ते अहरोनाचे व त्याच्या मुलांचे होईल. परमेश्वरासाठी केलेले हे अर्पण अति पवित्र आहे.
4 “जेव्हा भट्टीत भाजलेले अन्नार्पण करावयाचे असेल, तर ते तेलात मळलेल्या मैद्याचे बेखमीर भाकरीचे वा वरुन तेल ओतलेल्या बेखमीर चपात्याचे असले पाहिजे.
5 जर तुला तव्यावर भाजलेल्या भाकरीचे अन्नार्पण करावयाचे असेल तर ते तेलात मळलेल्या बेखमीर मैद्याचे असावे.
6 त्याचे लहान लहान तुकडे करून त्यांच्यावर तेल ओतावे; हे अन्नार्पण होय.
7 कढईत तळलेल्यातले अन्नार्पण असेल तर ते तेलात मळलेल्या उत्तम मैद्याचे असावे.
8 “अशाप्रकारचे अन्नार्पण तू परमेश्वरासमोर आणावे; ते याजकाकडे द्यावे व त्याने ते वेदीवर अर्पावे.
9 मग याजकाने अन्नार्पणातून स्मारकाचा भाग घेऊन वेदीवर त्याचा होम करावा. हे अग्नीद्वारे केलेले अर्पण आहे; त्याच्या सुवासाने परमेश्वराला आनंद होतो.
10 अन्नार्पणातून जे काही उरेल ते अहरोन व त्याच्या मुलांचे असेल; अग्नीद्वारे परमेश्वराला केलेले हे अर्पण अतिपवित्र आहे.
11 “खमीर असलेले कोणतेही अर्पण परमेश्वराला अर्पू नये कारण होमाग्नीमध्ये खमीर किंवा मध हे परमेश्वराला अर्पण म्हणून अर्पावयाचे नाही.
12 प्रथम उत्पन्न म्हणून त्यांचे अर्पण परमेश्वराला करावे; पण ते सुवासिक अर्पण म्हणून वेदीवर अर्पू नये.
13 तू करशील ते प्रत्येक अन्नार्पण मिठाने रुचकर कर; तू आपल्या देवाशी केलेल्या कराराचे मीठ आपल्या अन्नार्पणात घालावयास चुकू नको; तुझ्या सर्व अर्पणाबरोबर मीठ पण अर्पावे.
14 “परमेश्वराकरिता तुला धान्यार्पण म्हणून पहिल्या हंगामाचा उपज अर्पावयाचा असेल तर विस्तवावर माजलेल्या हिरव्या कणसातले चोळून काढलेले ताजे दाणे आण; हे हंगामातील तुझ्या प्रथम पिकाचे धान्यार्पण होय.
15 त्यावर तेल ओत आणि धूप ठेव; हे धान्यार्पण होय.
16 चोळून काढलेले दाणे व तेल ह्यापैकी काही व सर्व धूप ह्यांचा याजकाने स्मारकभाग म्हणून होम करावा; हे परमेशवरासाठी अग्नीद्वारे केलेले अर्पण आहे.

Top |  | अगला-  |  | Index |  | Home
Full online version here [with search engine, multilingual display and audio Bible]